भाजपच्या बोराळकरांना साडेपाच लाखांचा गंडा

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : कंपनीसाठी कंडोम पॅकिंगसाठी ब्लिस्टर पैकिंग मशिन देण्याच्या बहाण्याने एका कंपनीला ५ लाख ५० रुपयांचा गंडा घालत फसवणूक केली. याप्रकरणी गुजरात येथील क्रिष्णम फार्मा मशिनरी कंपनीचे संचालक आदित्य, पांचाल व नितीन पांचाल यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्रात भाजपचे माजी शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांची के ११७ येथे युनिव्हर्सल प्रोफीलॅटीक प्रा.लि. नावाची कंपनी आहे. कंपनीत विविध कंपनीचे कंडोम बनवून ते एसपोर्ट केले जाते. कंपनीला नवीन मशिन खरेदी करायची असल्याने त्यांनी अहमदाबाद (गुजरात) येथील क्रिष्णम फार्मा मशिनरी कंपनीशी व्यवस्थापकाने संपर्क केला. त्यावेळी कंपनीचे संचालक आदित्य व नितीन पांचाल या बापलेकांनी २०२५ मध्ये कंपनीत येऊन मालक बोराळकर यांना मशिनबाबत माहिती देऊन चर्चा केली. यानंतर कंपनीने पूर्णपणे स्वयंचलित केपीएम-एएलवु ब्लिस्टर पॅकिंग मशिन घेण्याचे ठरवून त्यांना ६ ऑगस्ट २०२५ मध्ये ११ लाख रुपये किमतीची मशिन व ७५ हजार रुपये किमतीचे डीफॉइलिंग मशिनची ऑर्डर देण्यात आली. अ‍ॅडव्हान्स पेमेन्ट देऊन पीओ दिल्यानंतर ४५ दिवसांत मशिन देण्याचे त्यांनी सांगितले होते.